डिजिटल मिडीयाला मिळाली राजमान्यता शासन निर्णय जारी, महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे राजा माने यांनी मानले आभार ! (Digital media gets government approval, government decision issued, Raja Mane thanks Director General Brijesh Singh!)

Vidyanshnewslive
By -
0
डिजिटल मिडीयाला मिळाली राजमान्यता शासन निर्णय जारी, महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे राजा माने यांनी मानले आभार ! (Digital media gets government approval, government decision issued, Raja Mane thanks Director General Brijesh Singh!)


मुंबई :- महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात "मार्गदर्शक सूचना अधिसूचना" जारी करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीने खास सोलापुरी नॅपकिन गुच्छ देवून आभार मानले. आज मंत्रालयात ब्रिजेशसिंह यांच्या दालनात राजा माने यांनी भेट घेतली. काल दि.३ जून २०२५ रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनेक मुद्द्यांवर ब्रिजेशसिंह यांच्याशी चर्चा झाली. डिजिटल पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारांच्या विकासासाठी शासन अनुकूल असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

               राजमान्यतेचे द्वार खुले करण्याची ऐतिहासिक जबाबदारी राज्य सरकारने पार पाडल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग,  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला गेल्या सहा वर्षांपासून बळ देणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजा माने यांनी आभार मानले. राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील १२ हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)