Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या विद्यार्थी गैरवर्तन प्रकरणात निलंबित मुख्याध्यापक अटकेत, पुढील तपास सुरु (Suspended headmaster arrested in connection with a case of student misconduct at an ashram school in Ballarpur taluka; further investigation is underway.)

बल्लारपूर तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या विद्यार्थी गैरवर्तन प्रकरणात निलंबित मुख्याध्यापक अटकेत, पुढील तपास सुरु (Suspended headmaster arrested in connection with a case of student misconduct at an ashram school in Ballarpur taluka; further investigation is underway.)

बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या विद्यार्थी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलांशी झालेल्या कथित अनैसर्गिक कृत्याची प्रकरण दडपल्याचा आरोप असलेले निलंबित प्राथमिक मुख्याध्यापक प्रेमानंद सदाशिव देशमुख (वय ४८) यांना बल्लारपूर पोलिसांनी गुरुवारी दि. ६ ऑगस्ट रोजी अटक केली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील ७ व ११ वर्षीय दोन मुलांशी इतर विद्यार्थ्यांकडून अनैसर्गिक कृत्य झाल्याची माहिती मुख्याध्यापक देशमुख यांना देण्यात आली होती. मात्र, संबंधित घटनेची माहिती वरिष्ठांना किंवा पोलिसांना देण्याऐवजी त्यांनी ११ वर्षीय मुलाला प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण केल्याचा तसेच ही बाब कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
         दरम्यान, पीडित सख्ख्या भावांच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करत सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आश्रमशाळेत यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत का, याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर दोन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मोठ्या मुलाच्या पाठीवर व बरगडीजवळ मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेची गंभीर दखल घेत संस्थेच्या संचालकांनी मुख्याध्यापक प्रेमानंद देशमुख यांना तत्काळ निलंबित केले. अटक करण्यात आलेल्या प्रेमानंद देशमुख यांना बल्लारपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलिसांकडून प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या