घराशी एवढं प्रेम की चक्क त्यांनी नाकारले शासनाचे 2 कोटी रुपये, चीन मध्ये महामार्गाच्या मध्यभागी आहे घर (So much in love with the house that he actually refused 2 crore rupees from the government, the house is in the middle of the highway in China)

Vidyanshnewslive
By -
0
घराशी एवढं प्रेम की चक्क त्यांनी नाकारले शासनाचे 2 कोटी रुपये, चीन मध्ये महामार्गाच्या मध्यभागी आहे घर (So much in love with the house that he actually refused 2 crore rupees from the government, the house is in the middle of the highway in China)


वृत्तसेवा :- विकासकामांसाठी स्वतःची जागा आणि घर सोडावे लागणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण काही लोक कितीही पैसे दिले तरी आपली जागा सोडण्यास तयार नसतात. त्यांची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे चीनमधील जिनसी येथील हुआंग पिंग. पण आता जागा न सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होत आहे. येथे एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर तिथे कसे राहणार याची भीती वाटते असे पिंग सांगतात. परत मागे जाऊ शकलो असतो तर सरकारने दिलेले पैसे घेतले असते आणि केलेली कृती मूर्खपणाची वाटते असेही ते म्हणतात. कितीही पैसे देऊ असे म्हटले तरी ते आपले दोन मजली घर सोडण्यास किंवा ती जागा सोडण्यास तयार नव्हते. आता त्या घराभोवती बांधकाम सुरू आहे. गोंधळ आणि धुळीमुळे त्यांचे हाल होतात हे सांगायला नको. त्यावेळी दिलेले दोन कोटी रुपये न घेतल्याबद्दल आता पिंग पश्चात्ताप व्यक्त करत आहेत. त्यात पिंगचे घर आणि त्याभोवती सुरू असलेले विकासकाम दिसत आहे. पिंग पत्नी आणि नातवासोबत या घरात राहतात. एका बोगद्यातून ते बाहेर जातात आणि येतात. गोंधळामुळे झोप येत नसली तरी हे घर पाहण्यासाठी अनेक लोक येतात. त्यांच्याकडून पैसे घेण्याचा विचार पिंग आता करत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)