युजीसी-नेट परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर, ऑनलाईन स्वरूपात होणार परिक्षा (UGC-NET Exam Revised Dates Announced, Exams Will Be Conducted Online)

Vidyanshnewslive
By -
0
युजीसी-नेट परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर, ऑनलाईन स्वरूपात होणार परिक्षा (UGC-NET Exam Revised Dates Announced, Exams Will Be Conducted Online)


वृत्तसेवा :- पेपरफुटीच्या प्रकरणानंतर एनटीए ने शुक्रवारी (दि.२८) युजीसी-नेट फेरपरीक्षांच्या सुधारीत तारखा जाहीर केल्या आहेत. सीएसआयआर-नेट परीक्षा २५ ते २७ जुलै तर युजीसी-नेट परीक्षा २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. पेपरफुटी झालेली नेट परीक्षा १८ जूनला दोन सत्रांत ३१७ शहरांमध्ये झाली होती. तेव्हा ९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी १९ जूनला पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते. देशात विविध परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या अनागोंधी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. पेपर फुटीच्या वातावरणामुळे सबंध देश ढवळून निघाला असताना नेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीए ने समाधानकारक पाऊल उचलेले आहे. या वेळची फेरपरीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबरोबरच ऑल इंडीया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा दि. ६ जुलै रोजी घेतली जाणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)