पोलीस दलात उलटफेर, 65 सहायक पोलीस निरीक्षकांच्या व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या, बल्लारपूरातील 4 सहायक पोलीस निरीक्षकांची बदली तर 2 नवीन अधिकारी येणार ! (Change in the police force, transfers of 65 assistant police inspectors and sub-inspectors within the district, transfer of 4 assistant police inspectors in Ballarpur and 2 new officers will come !)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीतकडे लागलेले लक्ष व येत्या काही दिवसात अयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अपडेट राहावी या हेतूने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ रविंद्रसिग परदेशी यांच्या आदेशानव्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 39 सहायक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून सदर बदल्या या लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. यात बल्लारपूर शहराचा विचार करता बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर यांची ब्रम्हपुरीत करण्यात आली आहे तर सपोनि शैलेंश ठाकरे यांची शेगाव पोस्टे, सपोनि रमेश हत्तीगोटे यांची गोंडपिपरी पोस्टे, सपोनि प्रमोद रासकर यांची धाबा पोस्टे येथे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर बल्लारपूर शहरात नागभीड येथून सपोनि प्रमशाह सयाम व ब्रम्हपुरी येथून सपोनि राजेश गावळे बदलून येत आहेत याशिवाय कोठारी पोस्टे येथे असलेले सपोनि विकास गायकवाड यांची स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)