वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल. (A case has been filed against the forest area officer in the case of abuse.)

Vidyanshnewslive
By -
0

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल. (A case has been filed against the forest area officer in the case of abuse.)

चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर या वनविभागा अंतर्गत मोहली (प्रादे.) परिक्षेत्रात दिनांक- 08/08/2023 रोजी सायंकाळी 8.00 वाजताचे दरम्यान 1) श्री वासुदेव ठाकरे, रा. भद्रावती, 2) श्री. अक्षय बंडावार, रा. भद्रावती व 3) श्री. सुबोध तिवारी, रा. माजरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर हे आंबेगाव गावामध्ये लाल रंगाच्या गाडीवर आले असून जंगलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी कर्मचारी यांनी सदर इसमांना जंगल परिसरात फिरण्यास मनाई केली व आगरझरी मार्गे बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला वनाच्या बाहेर काढले म्हणून रात्री 10.39 वाजता मोबाईलवर श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादे.) यांना शिवीगाळ केल्याने भारतीय दंड सहितेच्या 1860 कलम 186, 504, 507 नुसार पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा क्र. 0441/2023, दिनांक 09/08/2023 अन्वये दाखल करण्यात आला प्रकरणाचा पुढील तपास श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहली (प्रादे.) चौकशी करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)