धक्कादायक ! भद्रावती येथे एकतर्फी प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, कुटुंबियांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला (Shocking ! In Bhadravati, an attempt was made to burn a minor girl with petrol due to a one-sided love affair, a major disaster was averted by vigilance of the family)

Vidyanshnewslive
By -
0

भद्रावती :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्यामुळे त्याच परिसरात राहणाऱ्या युवकाने तिच्या घरी जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भद्रावती येथे घडली. सदर प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच मुलीला लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (२८, रा. बेलगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची ओळख होती. आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दांत नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात केला. कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)