Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात लोकनेत्याला श्रद्धांजली वाहू या, सर्वपक्षीय सभेचे महात्मा गांधी पुतळा परिसर आयोजन (Let's pay homage to the people's leader in Ballarpur, organize an all-party tribute meeting at the Mahatma Gandhi statue premises.)

बल्लारपूर :- महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे 2019 च्या निवडणुकीतील एकमेव खासदार म्हणून ज्यांची ओळख होती असे माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं नुकतेच काही दिवसापूर्वी नवी दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर शासकीय इतमामात वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या निमित्ताने बल्लारपूर शहरात स्व. बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने आज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान महात्मा गांधी पुतळा परिसर, वस्ती विभाग बल्लारपूर येथे बल्लारपूर शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, व्यापारी मंडळ इंडियन मेडिकल असोसिएशन, बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभा, बल्लारपूर बिजनेस असोसिएशन, पत्रकार संघ ई च्या वतीने श्रध्दांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी या सभेस नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन स्व. बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीनं करण्यात आलेले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या