Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपुरातील सावरकर चौकात भीषण अपघात : एका महिलेचा मृत्यू तर २ गंभीर जखमी, ट्रकने दुचाकीला धडक दिल्याचे वृत्त

चंद्रपुरातील सावरकर चौकात भीषण अपघात : एका महिलेचा मृत्यू तर २ गंभीर जखमी, ट्रकने दुचाकीला धडक दिल्याचे वृत्त

चंद्रपूर :- तुकुम कडून चंद्रपुरात येत असलेले एक कुटुंब आज सायंकाळी जवळपास ५:३० वा झालेल्या भीषण अपघातात उध्वस्त झाले या कुटुंबातील महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर २ गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे याविषयीच्या अधिक माहितीनुसार तुकुम येथील निवासी असलेले एक कुटुंब काही आवश्यक कार्याकरिता चंद्रपूर शहरात येत असतांना आज सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान रामनगर पोलीस स्टेशन समोरील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात एका ट्रकने दुचाकीला धडक दिली सदर ट्रक हा बल्लारपूर वरून सावरकर चौकातून वळण घेऊन नागपूरला जात असल्याची माहिती आहे या धडकेमुळे दुचाकीवरील महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन सदर महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कार्यरत असलेले वाहतूक पोलीस केशव निकम यांनी सदर अपघातग्रस्ताना लगेच रुग्णालयात पाठविले मात्र महिलेचं डोकं रस्ता दुभाजकाला लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला तर २ जखमी असून त्यांचेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सदर घटनेचा तपास रामनगर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या