महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रविराज लिखित डीजे गीत "आम्ही भिमाची लेकरं" रसिकांच्या सेवेत
" आम्ही भिमाची लेकरं" या डीजे गीताचे " गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात " फेम अभिनेत्री चांदणी पाटील यांच्या हस्ते पोस्टर विमोचन !
बल्लारपूर :- १४ एप्रिल, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रविराज लिखित नवीन DJ गीत " आम्ही भीमाचे लेकर " चे पोस्टर विमोचन " गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात " फेम अभिनेत्री चांदणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात " गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात " या चित्रपटाचे निर्माते प्रशांत चंद्रिकापुर व अभिनेत्री अश्विनी चंद्रिकापुरे उपस्थित होत्या, रविराज यांनी येणाऱ्या गीता बद्दल माहिती दिली व त्यांनी सांगितले कि आम्ही भीमाचे लेकरं हे गीत लवकरच आपल्याला आवाज इंडिया या टीव्ही चैनल वर पाहायला मिळणार आहे व रेडिओ झकास मराठी या रेडिओ चैनल वर संपूर्ण जग भरात ऐकला मिळणार आहे. तसेच रविराज सांगितम या सोशल मीडिया युट्युब चैनल वर सुद्धा येणार आहे. उपस्थित मान्यवरांनी रविराज यांना शुभेच्या दिल्या आणि अभिनेत्री चांदणी पाटील यांनी सर्वांनान आवाहन केल कि आपण सर्वे भिमाचीच लेकरं आहोत त्यांनी सांगितले कि हे गीत आपल्याला नक्कीच आवडेल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या