केंद्र सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ (Major decision by the Central Government: 3% hike in Dearness Allowance for central government employees)
वृत्तसेवा :- केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी कॅबिनेटची मिटिंग पार पडली. या बैठकीत महागाई भत्त्याबाबत चर्चा झाली. ज्यानंतर महागाई भत्ता ३ टक्के वाढवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. DA आणि DR मध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने १० हजार १६ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची वाढ ही १ जुलैपासून लागू होणार आहे. याचाच अर्थ महागाई भत्ता ३ टक्के वाढला आहे ज्याचे पैसे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्यापासून मिळणार आहे. पुढील महिन्यांत जो पगार जमा होणार आहे त्यात याचे एरियर्स मिळणार आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६८ लाखांहून अधिक निवृत्ती वेतन धारकांना दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर कॅबिनेटचीच जी बैठक घेण्यात आली त्यात ३ टक्के महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता ६० वरून ६३ टक्के इतका झाला आहे. तसंच नोव्हेंबरमध्ये जो पगार जमा होईल त्यात कर्मचाऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर अशा चार महिन्यांचे एरियर्सही मिळणार आहेत. संपूर्ण महागाई भत्त्याच्या वाढीवर सरकार ₹१०,०१६ कोटी खर्च करणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा अंदाजे ४९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. ही संपूर्ण वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्थापित केलेल्या सूत्रावर आधारित असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने बुधवारी एकूण २९,२६७ कोटी रुपयांच्या विकास आणि कल्याणकारी पॅकेजेसना मंजुरी दिली. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या