Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कोरपण्यात कृषी सहाय्यकाला ४० हजार रुपयांची लाच घेतांना अटक (Anti-Corruption Bureau action: Agricultural assistant arrested while accepting a bribe of 40,000 rupees in Korpanat.)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कोरपण्यात कृषी सहाय्यकाला ४० हजार रुपयांची लाच घेतांना अटक (Anti-Corruption Bureau action: Agricultural assistant arrested while accepting a bribe of 40,000 rupees in Korpanat.)

चंद्रपूर :- भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती सप्ताह सुरू असतानाच कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वर्धा पथकाने रंगेहात पकडले. बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी करण्यात आली. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५), असे ताब्यात घेतलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे. तो कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी उदगीरे याने सुरुवातीला ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे त्याने मान्य केले होते. 
           तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार २७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या ८० नोटा, अशा एकूण ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने सायंकाळी ५.५५ वाजता उदगीरे याला रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल आणि ५९५ रुपये रोख आढळून आले. त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे आणि पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे व विष्णू काळुसे यांच्या पथकाने केली. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती सप्ताह सुरू असतानाच लाचेची ही घटना उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या