बल्लारपुर -: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला आहे. तब्बल ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या अटीतटीच्या मतमोजणीनंतर वंजारी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची मिळून एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली, तर भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. अशा प्रकारे वंजारी यांनी कोहळे यांच्यावर ३ हजार २७१ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. गुरुवारी दुपारी १२ वाजता नगर परिषद चौकात महाविकास आघाडी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर संघटनां तर्फे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला ला अभिवादन करण्यात आला. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा उत्सव साजरा केला.
या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. अल्का अनिल वाढइ, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, पूर्व नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, छाया मडावी, तालुका कांग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, डॉ. अनिल वाढई, सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख शिवसेना, सीनेट सदस्य दीपक धोपटे, नगरसेवक भास्कर माकोडे, करुणा रेब्बावार, शिल्पा चुटे, मोना धानोरकर, अंकुबाई भुक्या, मनोज बेले, अफसाना सैय्यद, इंदु राजुरकर, सपना मोरे, प्रियंका नाईक, सुवर्ण मुरकुटे, ज्योति गहलोद, प्रा.बल्कि, प्रा. अनिल वाग्दरकर, प्रकाश पाठक, प्रा. युवराज बोबडे, किसन पोड़े, मनोहर मालेकर, श्रीधर फटाले, चेतन गेडाम नरेश आनंद गणपत इटणकर डेविड कम्पेल्ली फहीम शेख बाबू राशिद फारुख शेख रवी बेले अनिल खरतड आर आर यादव युसूफ शेख संजय झिल्लेवर सुधाकर पोपळे प्रभाकर मुरकुटे महमूद पठाण सादिक शेख अस्लम शेख नाना बुंदेल अजय जुमडे दिलीप मकोडे सुधीर अमराज प्राणेश अमराज नितीन तेलंग सह महाविकास आघाडी चे नेते व कार्यकरता उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या