Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नितेश कराळे गुरुजी ठरले सिंग इज किंग...! दुसऱ्या क्रमांकाच्या मताने विजयी ठरले अभिजीत वंजारी (Nitesh Karale Guruji proves to be the 'Singh is King'...! Abhijit Vanjari emerges victorious, securing the second-highest number of votes.)

नितेश कराळे गुरुजी ठरले सिंग इज किंग...! दुसऱ्या क्रमांकाच्या मताने विजयी ठरले अभिजीत वंजारी (Nitesh Karale Guruji proves to be the 'Singh is King'...! Abhijit Vanjari emerges victorious, securing the second-highest number of votes.)

वृत्तसेवा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तब्बल 45 तासांपासून सुरू असलेली मतमोजणी अद्याप पूर्ण न झाल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली; मात्र विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आणि निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलल्याचे चित्र समोर आले. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी सुमारे 3227 मतांनी आघाडी घेत बाजी मारली. या निवडणुकीची चर्चा नागपूरसह संपूर्ण विदर्भात रंगली होती. तर राज्यभरात अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांच्या मतांची भूमिका चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांमुळे वंजारी यांच्या बाजूने समीकरण बदलल्याचे सांगितले जात असल्याने ‘कराळे मास्तर ठरले सिंग इज किंग!’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. 
          मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यापेक्षा ४ हजार २९४ मते अधिक मिळवली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात विजयाची आशा निर्माण झाली होती. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली. पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या मतमोजणीत प्रत्येक टप्प्याला उमेदवारांचे गणित बदलण्याची शक्यता असते. याच प्रक्रियेमुळे सुरुवातीला आघाडीवर असलेल्या कोहळे यांच्या समोरील आव्हान वाढल्याचे चित्र दिसून आले, तर वंजारी यांच्या विजयाच्या दाव्याला बळ मिळाल्याचे सांगितले जात होते. एखाद्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करावी आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून जनमानसात ठसा उमटवावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा रंगते. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, चिमूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नितेश कराळे मास्तर यांची भूमिका चर्चेत आली. या निवडणुकीत कराळे मास्तर हे स्वतः विजयाचे प्रमुख दावेदार नसले, तरी त्यांच्या मतांना मिळालेल्या संभाव्य महत्त्वामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या चर्चेमुळे त्यांचे नाव मतमोजणीच्या केंद्रापासून राजकीय चर्चांच्या व्यासपीठापर्यंत पोहोचले. निवडणुकीत विजय मिळवणे जितके महत्त्वाचे, तितकीच काही वेळा निकालाच्या समीकरणावर प्रभाव टाकणारी भूमिका चर्चेत येते. कराळे मास्तरांच्या बाबतीतही अशीच चर्चा रंगली. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निकालाच्या निमित्ताने सरकार विरुद्ध मिळालेला जनतेचा पाठींबा बघता त्यांच्या राजकीय प्रभावाबाबत आणि भविष्यातील वाटचालीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले. 
             नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत समीकरणांची चर्चा रंगली होती. कोहळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतावर जणुकाही सोलेंची भिस्त असावी. परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर सोलेंनी उमेदवारी मागे घेत सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला. जर प्रा. सोले अपक्ष निवडणूक लढले असते तर चित्र वेगळे असते. सिंग इज किंग’ ही उपमा कराळे मास्तरांच्या निर्णायक भूमिकेच्या चर्चेतून पुढे आली असली, तरी त्यांच्या मतांचा नेमका परिणाम अधिकृत आकडेवारीतूनच स्पष्ट होणार असला तरी त्यांचे मताधिक्य हे २७ हजारावर जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीने केवळ उमेदवारांच्या विजय-पराजयाचीच नव्हे, तर पसंतीक्रमाच्या राजकारणाची आणि अपक्ष उमेदवारांच्या संभाव्य प्रभावाचीही चर्चा पुढे आणली. एवढेच नव्हे तर कराळे मास्तरांचे मताधिक्य बघता सरकारविरुद्ध जनमानसात असलेली ‘खदखद..’ त्यांच्या मतपत्रिकेवर पडलेल्या पहिल्या पसंतीचे, आणि दुसऱ्या पसंतीच्या मताच्या एकूण आकड्यावरून काँग्रेसचे उमेदवार ऍड. अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या रूपात अधोरेखित झाली, हे विशेष.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या