Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत पहिली भेट, मतदारांनो! मतदार यादीत आताच आपले नाव तपासा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Voters, the first visit under the Special Intensive Revision (SIR) program is here! Check your name in the voter list right now – Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari.)

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत पहिली भेट, मतदारांनो! मतदार यादीत आताच आपले नाव तपासा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (Voters, the first visit under the Special Intensive Revision (SIR) program is here! Check your name in the voter list right now – Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari.)

   

चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत, प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणारे दावे व हरकती निकाली काढण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्याकरीता मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज (दि. 10) चंद्रपूर येथे पहिली भेट दिली. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत मतदारांनी आताच आपले नाव तपासून घ्‍यावे, असे आवाहन श्रीमती बिदरी यांनी केले. अंतिम यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्यात येईल, असे सांगून मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी म्हणाल्या, 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या कालावधीत नव्याने नाव नोंदविणे, मतदार यादीत काही दुरुस्ती, आदी बाबी असल्यास तपासून घ्याव्यात. ज्यांच्या नावात विसंगती आहे, किंवा ज्यांचे मॅपिंग झाले नाही अशांना नोटीस गेल्यानंतर, त्यांनी बीएलओ/बीएलए यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीला हजर राहून पुर्तता करून घ्यावी. कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही. प्रारुप मतदार याद्या, ‍जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, मतदान बुथ, स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालये आदी ठिकाणी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनासुध्दा मतदार याद्या देण्यात आल्या आहेत. दिव्यांग, वयोवृध्द मतदारांचे नाव तपासण्यासाठी तसेच वस्ती, तांडा, पाडे आदी ठिकाणी विशेष शिबिरे आयेाजित करावे. मतदार यादीत नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत. मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास किंवा 1 ऑक्टो 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असल्यास फॉर्म 6, नाव वगळावयाचे असेल किंवा काही हरकत असेल तर फॉर्म 7 आणि एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या बुथवर असेल किंवा वय, नाव, पत्ता, यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास फॉर्म 8 भरून द्यावा. सर्व फार्म भरून घेण्याची मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे.
              सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नाही विशेष सखोल पुनरीक्षण-2026 च्या पहिल्या टप्प्यात मतदार, सर्वसाधारण निवासी असल्याबद्दलच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यावर मुख्य भर देण्यात आला होता. म्हणूनच, अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर जे लोक प्रत्यक्षात राहत नाहीत, अशा लोकांचा समावेश या प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. सध्या सुरू असलेला टप्प्याअंतर्गत जे मतदार (अर्जात दिलेल्या पत्त्यावर) हजर नाहीत किंवा तिथून दुसरीकडे राहायला गेले आहेत, पण राज्याच्या हद्दीतच राहत आहेत, असे मतदार आता त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणच्या यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात. अशी संधी त्याना उपलब्ध आहे. याचप्रमाणे, मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच, 1 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या संपूर्ण पहिल्या टप्प्यादरम्यान राहत्या ठिकाणावरून दीर्घकाळ अनुपस्थित असण्यासारख्या वा इतर कारणांमुळे ज्यांची नावे यादीत समाविष्ट झालेली नसतील, ते लोकसुद्धा आता मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा सध्याचा टप्पा हा नवीन नावे नोंदवून घेण्यावरच केंद्रित आहे. याद्वारे एकही पात्र नागरिक मतदार यादीतून सुटणार नाही, याची सुनिश्चिती केली जात आहे. ही संपूर्ण मोहीम नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होईल. त्यामुळे, सध्याच्या यादीची तुलना आधीच्या आकडेवारीशी करणे (पूर्णपणे अयोग्य आणि चुकीचे ठरेल. कोणतीही तुलना किंवा मूल्यमापन करण्यापूर्वी त्यांनी अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची वाट पाहावी.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या