महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर (Dates announced for the 10th and 12th-grade examinations to be conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education in February-March.)
पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी (ता.17 सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केल जात आहे. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 या काळात होणार आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या आगामी बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या दरम्यान पार पडणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 तसेच प्रात्यक्षिक,श्रेणी,तोंडी परीक्षा ही 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय शिक्षण मंडळातंर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. या नऊ विभागात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय शिक्षण मंडळांचा समावेश होतो. इयत्ता बारावी अन् दहावीच्या परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येत असतो.काही महिने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापाठीमागं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तम तयारी करता यावी हा उद्देश असतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या