दीक्षाभूमी परिसरात बाबासाहेबांचा ५१ फुटी पुतळा, विपश्यना केंद्र व ३ नवे प्रवेशद्वार राहणार
चंद्रपूर :- चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत या बहुप्रतिक्षित विकास आराखड्याची अधिकृत माहिती दिली. तब्बल ५६ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून या ऐतिहासिक भूमीवर ५१ फुटी बाबासाहेबांचा पुतळा, विपश्यना केंद्र आणि थीम पार्क साकारले जाणार आहे. चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासकामाचे लवकरच भूमिपूजन होणार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आणि ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर झाला. दीक्षाभूमी परिसरात काय विशेष असणार आहे यावर आमदारांनी प्रकाश टाकला. दीक्षाभूमी परिसरात बाबासाहेबांचा ५१ फुटी पुतळा, कम्युनिटी हॉल, विपश्यना केंद्र, थीम पार्क, नवे विहार अशे विविध विकासकामे दीक्षाभूमी परिसरात होणार असून यामध्ये तब्बल ३ नवे प्रवेशद्वार असणार आहे.
चंद्रपूर दीक्षाभूमीचे रुपडं पूर्णतः बदलणार असून याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी विकसनशील दीक्षाभूमीची झलक दाखवली. काही दिवसात दीक्षाभूमीच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी दीक्षाभूमीच्या विकासाबाबत निधीची मागणी केली होती. निधी समाजकल्याण विभागाकडे आला असून वेळोवेळी तो सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे, आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारात कोट्यवधी रुपयांचा निधी दीक्षाभूमीसाठी मिळाल्याने भविष्यात हा परिसर पर्यटन साठी जगभरात प्रसिद्ध होणार असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला. दीक्षाभूमीच्या कामात काही त्रुटी दिसल्यास समाजबांधवांनी त्या लेखीस्वरूपात द्यावा प्रशासन त्या त्रुट्या दुरुस्त करणार, त्यामुळे समाजबांधवांनी या पावन भूमी परिसराच्या विकासाला सहयोग करावा असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी यावेळी केले. सध्या दीक्षाभूमी बाबत जो संभ्रम पसरलेला आहे त्याबाबत आमदार जोरगेवार हे घोटेकर व खोब्रागडे कुटुंब यांची मते जाणून दीक्षाभूमी परिसरात अजून काय व्हायला हवं असे लेखी जाणून घेणार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नरत राहणार असून पुढेही अनेक कामे मार्गी लावायचे आहे ज्यामध्ये ताडोबा सफारी प्रकल्प, महाकाली मंदिर परिसराचा विकास, हेरिटेज वॉक असे अनेक कामांचा त्यांनी उल्लेख केला. सध्या दीक्षाभूमी च्या विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र त्या अडथळ्याकडे लक्ष न देता, बाबासाहेबांच्या पदस्पर्श झालेल्या या दीक्षाभूमीचा विकास कसा होणार याकडे सर्व समाजबांधवांनी सहयोग करावा असेही आवाहन त्यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या