Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा (Dr. Sarvepalli Radhakrishnan's Birth Anniversary and Teachers' Day Celebrated with Enthusiasm at Mahatma Jotiba Phule College)

महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा (Dr. Sarvepalli Radhakrishnan's Birth Anniversary and Teachers' Day Celebrated with Enthusiasm at Mahatma Jotiba Phule College)

बल्लारपूर :- महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून शिक्षक दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कार, मूल्ये आणि योग्य दिशा देण्याचे कार्य करतात, असे यावेळी प्रतिपादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल सर, ग्रंथपाल डॉ. पंकज कावरे सर, क्रीडा संचालक डॉ. बालमुकुंद कायरकर सर, डॉ. किशोर चोरे सर, डॉ. चौहान सर, डॉ. जुनगरे मॅडम, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे साखरकर सर व गेडाम सर उपस्थित होते. याशिवाय डॉ. सोनोने सर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मेश्राम सर, श्यामराव दरेकर व अश्विनी ताई यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित सर्वांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्श शैक्षणिक मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या