विरूर स्टेशन :- गावातील जागरूक व सुशिक्षित तरुण मंडळींनी एकत्र येऊन श्रमदानातून हाती घेतलेला स्वच्छता उपक्रम हा अत्यंत स्तुत्य, कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. गावातील तरुण स्वतःहून झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ करतात, ही बाब ग्रामपंचायतीसाठी किंवा गावासाठी लाजीरवाणी नसून 'आपले गाव, आपली जबाबदारी' या लोकसहभागाच्या आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामसफाई' संदेशाची जिवंत प्रचीती आहे. ग्रामपंचायत प्रशासन या सर्व युवा सैनिकांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक करते. युवा शक्तीचे अभिनंदन गावातील तरुण विशाल देरकर, नानी राठोड, प्रेम श्रीकोंडावार, संस्कार निमलवार, शुभम भोस्कर, रोहन सोनी, श्रावण रेड्डी, करण कहार, अस्मित बोडेकर, स्नेहल मोरे, प्रतीक मोरे साहिल अलोने चेतन वरवlडे अनिकेत चोचले परिवर जीव तोडे संजू वर्मा आदित्य वर्मा विकी सोनी शीतिज तुराणकर प्रवीण नांदेकर पवन सोनी प्रतीक मोरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे श्रमदान केले आहे, त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत विरूर स्टेशन ही नेहमीच गावाच्या आरोग्यासाठी व स्वच्छतेसाठी कटिबद्ध आहे. दैनंदिन कचरा संकलन आणि साफसफाईसाठी कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा कचरा यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन कचराकुंड्यांची उभारणी व घंटागाडी/कचरा गाड्यांची नियमित फेरी याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. असे ग्रामपंचायत अधिकारी कातकर यांनी सांगितले. तसेच
नागरिकांची आणि तरुणांची मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायत लवकरच विशेष स्वच्छता मोहीम राबवत आहे. ज्या भागात कचराकुंडीची तातडीने गरज आहे, तिथे नवीन कचराकुंडी व कचरा संकलन केंद्र उभारण्यात येईल. ग्रामपंचायत ही कुठल्याही एका संस्थेची किंवा कर्मचाऱ्यांची नसून संपूर्ण गावाची असते. लोकसहभागाशिवाय कोणताही गाव पूर्णपणे स्वच्छ राहू शकत नाही. तरुणांनी दाखवलेली ही दिशा नक्कीच अभिनंदनीय आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील युवा पिढी आता हातात हात घालून विरूर स्टेशनला चंद्रपूर जिल्ह्यातील 'आदर्श व स्वच्छ गाव' बनवण्यासाठी एकत्र काम करेल. गावातील नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करावे. असे ग्रामसेवक यांची विचारधारा आहे. सदर नागरिकाकडून जे स्वच्छतेचे काम सुरू आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि ग्रामसेवक यांनी सुद्धा गावासाठी व्यवस्थित काम करेल असे सांगितले. करिता समोर गावातील स्वच्छता अभियान व्यवस्थित होईल असे सर्वांना वाटत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या