Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद...आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र ! (Tukaram Mundhe interacts with students of N. H. Vidyalaya... The Commissioner shares a 'Guru Mantra' with the students !)

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद...आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र ! (Tukaram Mundhe interacts with students of N. H. Vidyalaya... The Commissioner shares a 'Guru Mantra' with the students !)

नागभीड :- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली ने. हि. विद्यालयाच्या 13 विद्यार्थ्यांनी तुकाराम मुंडे यांचे कार्यक्रमात अमरावती येथे भेट घेऊन शैक्षणिक ऊर्जेची अनुभूती घेतली. तरुणाईशी संवाद या अफाट गर्दीच्या ठिकाणी साहेबांशी भेट होऊ शकली नसली तरी मुंडे च्या भेटीला आसुरलेल्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज स्मारक मध्ये मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी शासकीय विश्राम गृहामध्ये सकाळी 6. वाजता जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला. ने. हि. विदयालयाचे चमूने आपला परिचय दिला व सरांनी मुलांना प्रश्न विचारून काय बनायचं आहे हा सवाल केला. मुलांनी उत्तर दिल IAS. उत्तर ऐकून आयुक्त चकित झाले, नंतर शिक्षकांना प्रश्न विचारले की शाळेत काय काय उपक्रम चालतात? शाळेत चाललेल्या सर्व उपक्रमाची यादी वाचली. परिपाठापासून तर जंक फूड विरोध व चणे फुटाणे वाटपाचा उपक्रम त्यांच्या पुढ्यात मांडला. तुकाराम मुंडे यांनी सर्वाना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या सर्व मुलाच्या पाठीवरून हात फिरवले . भविष्यातील उत्तुंग भरारीचा मंत्र देऊन रजा घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीने गदगद झालेली ने. हि. विद्यालयाची चमू ही अनुभूती सोबत ठेवून प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्यास तत्पर होतील यात शंका नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या