Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

मूल च्या राजगड मध्ये विश्वासघात करून सोन्याची चैन लंपास, एकाला अटक, मुख्य संशयित फरार (Gold chain stolen through treachery in Mul's Rajgad area; one arrested, prime suspect absconding.)

मूल च्या राजगड मध्ये विश्वासघात करून सोन्याची चैन लंपास, एकाला अटक, मुख्य संशयित फरार (Gold chain stolen through treachery in Mul's Rajgad area; one arrested, prime suspect absconding.)

चंद्रपूर :- राजगड येथील ६७ वर्षीय महिलेच्या घरातून चोरीस गेलेली सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मूल पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत केली आहे. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित फरार आहे. राजगड, ता. मूल येथील रहिवासी वंदना प्रेमानंद सोरते यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. डाव्या डोळ्याने कमी दिसत असल्याने त्या २६ जून रोजी उपचारासाठी गडचिरोली येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची नात व तिचा पती तथागत निमगडे हे त्यांच्या सोबत राहत होते. उपचारानंतर त्या घरी परतल्यानंतर निमगडे हा वडिलांची प्रकृती खराब असल्याचे सांगून पत्नीसमवेत आपल्या गावी निघून गेला. दरम्यान, २७ जून रोजी सोरते यांनी घरातील दागिन्यांची डबी तपासली असता त्यामध्ये ठेवलेली सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी तथागत निमगडे याच्यावर चोरीचा संशय व्यक्त करून मूल पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सायबर सेल, चंद्रपूरच्या मदतीने आरोपीचे एसडीआर व सीडीआर मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून तथागत निमगडे याचा प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे याच्याशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. 
          पोलिसांनी उंदीरवाडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर सोन्याची चैन तथागत निमगडे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीस गेलेली अंदाजे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे ६१ वर्ष रा. राजगड, ता. मूल याला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयित तथागत शागीर निमगडे, रा. विरई, पो. फिस्कुटी, ता. मूल, जि. चंद्रपूर हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस हवालदार नरेश कोडापे तसेच पोलीस अंमलदार दिलीप आडे, नरेंद्र वाकडे, प्रकाश विक्रम, शंकर बोरसरे सह चंद्रपूर सायबर सेल यांनी केले. तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या