Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

व्यवस्थेने युवकांना झुरळ किंवा परजीवी संबोधलय परिणाम 'कॉकरोच जनता पार्टी'चा देशभरात धुमाकूळ, बॉलिवूड कलाकारांचाही फुल्ल सपोर्ट; फॉलोअर्संच्या यादीत बड्या सेलिब्रिटींची नावं (The establishment labeled the youth as "cockroaches" or "parasites"—the result? The "Cockroach Janata Party" is taking the nation by storm, enjoying full support from Bollywood artists as well; the list of its followers features the names of major celebrities.)

व्यवस्थेने युवकांना झुरळ किंवा परजीवी संबोधलय परिणाम 'कॉकरोच जनता पार्टी'चा देशभरात धुमाकूळ, बॉलिवूड कलाकारांचाही फुल्ल सपोर्ट; फॉलोअर्संच्या यादीत बड्या सेलिब्रिटींची नावं (The establishment labeled the youth as "cockroaches" or "parasites"—the result? The "Cockroach Janata Party" is taking the nation by storm, enjoying full support from Bollywood artists as well; the list of its followers features the names of major celebrities.)

वृत्तसेवा :- गेल्या काही सोशल मीडिया क्रांती पाहायला मिळतेय. अनेक देशात युवा वर्गानं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा बदल घडवलाय. आता गेल्या काही दिवसांत एका नावानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय ते नाव म्हणजे 'कॉकरोच जनता पार्टी'. सुरुवातीला केवळ एक उपरोधिक मोहीम म्हणून सुरू झालेल्या या पेजनं अवघ्या पाच-सह दिवसांत सोशल मीडियावर रेकॉर्ड ब्रेक फॉलोअर्स मिळवले आहेत. इंस्टाग्रामवर या पेजच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ११ दशलक्ष (१.१ कोटी) पार गेली असून, त्यांनी देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीलाही (BJP) मागं टाकलं आहे. विशेष म्हणजे, या डिजिटल आंदोलनात आता सर्वसामान्य तरुणांसोबतच बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकही सामील झाले आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी'ला बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या पेजला फॉलो केलं आहे. अभिनेत्री दिया मिर्झा, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, उर्फी जावेद, ईशा गुप्ता हिमांशी खुराना यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'ला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनीही या पेजला फॉलो केलंय. तर विशाल डडलानी, उमर रियाज, अभिषेक निगम, नगमा मिराजकर, पूरव झा, रौनक रजानी, शफाक नाज, शीजान खान या सेलिब्रिटींनीही 'कॉकरोच जनता पार्टी'ला पाठिंबा दिलाय. 
            'कॉकरोच जनता पार्टी' का सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याशी जोडलं गेलंय. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान सोशल मीडियावरील काही बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे 'कॉकरोच' (झुरळ) आणि 'परजीवी' यांच्याशी केली होती. यानंतर प्रतिक्रिया उमटल्या. वातावरण तापल्यानंतर सूर्यकांत यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. यानंतर 'कॉकरोच' मात्र भलतंच ट्रेडिंगमध्ये आलं. अनेक तरुण मी 'कॉकरोच' आहे, असं उपरोधिकपणे सांगू लागले. यातूनच 'कॉकरोच जनता पार्टी' तयार झाली. या मोहिमेची सुरुवात पुण्याचा मूळ रहिवासी आणि सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्क क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारा ३० वर्षीय युवक अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यानं केली आहे. त्यानं स्वत:ला 'कॉकरोच जनता पार्टी' या पक्षाचा 'संस्थापक अध्यक्ष' घोषित केलंय या पार्टीनं आपलं घोषणापत्रदी जाहीर केलंय. 'घोषणापत्रात' काही गंभीर मुद्देही उपरोधिकपणे मांडले आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतीही राज्यसभेची जागा किंवा सरकारी पद मिळू नये. तर असे अनेक मुद्दे यात आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या