Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपुरात एमडी ड्रग्जचा सुमारे ५ लाख ९० हजार रुपये साठा जप्त : नागपूरचा युवक स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात (MD Drugs Worth Approximately ₹5.90 Lakh Seized in Chandrapur: Youth from Nagpur Taken into Custody by Local Crime Branch)

चंद्रपुरात एमडी ड्रग्जचा सुमारे ५ लाख ९० हजार रुपये साठा जप्त : नागपूरचा युवक स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात (MD Drugs Worth Approximately ₹5.90 Lakh Seized in Chandrapur: Youth from Nagpur Taken into Custody by Local Crime Branch)

चंद्रपूर :- जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत नागपूर मार्गावरील खांबाडा शिवारातून एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत नागपूर येथील एका युवकाला अटक करण्यात आली असून, दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अमित कृष्णा गजभिये (वय २३), रा. इंदोरा, नागपूर असे आरोपींचे नाव असून आरोपी हर्षल टेंभेकर रा. इंदोरा, नागपूर आणि सोहेल शेख उर्फ सोहेल एसके रा. चंद्रपूर हे फरार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरोरा परिसरात गस्त घालत असताना नागपूरहून एक इसम एमडी ड्रग्ज विक्रीसाठी चंद्रपूरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबाडा शिवारात सापळा रचला. 
           दरम्यान, संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका मोपेडस्वाराला पोलिसांनी अडवून झडती घेतली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून १०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित कृष्णा गजभिये (वय २३), रा. इंदोरा, नागपूर असे आहे. चौकशीत त्याने नागपूर व चंद्रपूर येथील साथीदारांच्या मदतीने हा माल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या प्रकरणात हर्षल टेंभेकर रा. इंदोरा, नागपूर आणि सोहेल शेख उर्फ सोहेल एसके रा. चंद्रपूर हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्जसह मोबाईल फोन आणि एमएच-३१-एफएच-२०४९ क्रमांकाची मोपेड जप्त केली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार तसेच सायबर सेल चे पोहवा कार्तिक खनके, पोअं अनिमेश भोंगळे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या