अमरावती :- सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व महाराष्ट्र शासनातील सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले कवी लेखक दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची अमरावती येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे .हे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी तर्फे मिशन आयएएस अंतर्गत अमरावती परतवाडा रोडवरील भव्य अशा सिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे .यापूर्वी झालेल्या या तीन स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वश्री महाराष्ट्राचे मुख्य सचिव व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व विदर्भाचे सुपुत्र श्री जे पी डांगे दुसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र जाधव तर तिसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व वयाच्या सुप्रसिद्ध अशा यशदाला मानद संचालक म्हणून कार्यरत असणारे हरिभक्त पारायण श्री रंगनाथ नाईकडे आय एफ एस यांची निवड झाली होती.
पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन हे अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाले होते तर दुसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन हे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या गुरुकुंज मोझरी येथील स्मृतिभवन मध्ये संपन्न झाले होते तर तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कविवर्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सभागृहात संपन्न झाले होते. या तीनही साहित्य संमेलनाला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला होता. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून हे संमेलन सातत्याने आयोजित केले जाते. या संमेलनातून विद्यार्थ्यांना योग्य ती दिशा प्राप्त होते. याशिवाय जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे अनुभव मार्गदर्शन कवी संमेलन इत्यादी विविध उपक्रम या साहित्य संमेलनामध्ये राबविण्यात येतात. श्री पुरुषोत्तम भापकर हे अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिले असून छत्रपती संभाजी नगर येथे महानगरपालिका आयुक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर मंत्रालयामध्ये कार्यरत असताना ते सेवानिवृत्त झाले .एक कर्तव्यदक्ष तपस्वी तेजस्वी तत्पर सनदी अधिकारी म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. त्यांनी विविध पुस्तके लिहिली असून त्यांच्या जीवन कार्यावर पुरुषोत्तम हा चित्रपट देखील निघालेला आहे. श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे अनुकरण श्री भापकर हे आपल्या प्रत्यक्ष जीवनात करतात. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नियुक्ती झाली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वतः साफ करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्यांची स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या