Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूरात " बुवा व बाया " विषयावर डॉ. श्याम मानव यांचे 9 मे ला व्याख्यान (Dr. Shyam Manav's Lecture on the Topic "Gurus and Women" in Chandrapur on May 9th.)

चंद्रपूरात " बुवा व बाया " विषयावर डॉ. श्याम मानव यांचे 9 मे ला व्याख्यान (Dr. Shyam Manav's Lecture on the Topic "Gurus and Women" in Chandrapur on May 9th.)


चंद्रपूर :- फुले-शाहू-आंबेडकराचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेचा कळस लागला आहे भोंदू बाबाच्या मागे लागून अनेक कुटुंब उध्वस्त होऊ लागली आहे अनेक कुटुंब आर्थिक शोषणासोबतच लैंगिक शोषणाचे बळी ठरले आहे. वर्तमान स्थितीचा विचार करता महाराष्ट्रात बाबा बागेश्वर व अशोक खरात सारखे स्वयंघोषित बाबा सामान्य जनतेच्या भावनेशी खेळत आहे विशेष बाब म्हणजे अशा स्वयंघोषित बाबाच्या मागे सामान्य जनताच नव्हे तर मोठं मोठे राजकीय नेत्यांचेही भेटी गाठी झाल्याची चर्चा आहे त्यातही भारताचे माजी सरन्यायाधीश बागेश्वर धामच्या बाबाची भेट घेतल्याची माहिती असून देशात वाढलेल्या अशा अनेक अंधश्रद्धावर प्रहार करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. श्याम मानव हे प्रबोधनासाठी चंद्रपूरात येत असून 9 मे ला सायंकाळी 6:30 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात " बुवा व बाया " या विषयावर डॉ. श्याम मानव यांचे व्याख्यान असून या कार्यक्रमाचे उदघाटक आमदार सुधाकर अडबाले तर अध्यक्ष खासदार प्रतिभाताई धानोरकर राहणार असून या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला जनतेनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या