Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

दिवंगत अभिमन्यू उरकुडा फुलकर यांच्या 5 व्या स्मृतीदिनानिमित्त औचित्य साधून प्रा.डॉ. रोशन फुलकर यांनी दिले कॉम्प्युटर डेस्कटॉप भेट (Marking the occasion of the 5th death anniversary of the late Abhimanyu Urkuda Phulkar, Prof. Dr. Roshan Phulkar donated a desktop computer.)

चंद्रपूर :- आज दिनांक 13/05/2026 बौद्ध हितकारिणी सभा चंद्रपूर महाराष्ट्र द्वारा संचालित रमाई केअर रुग्ण सेवा केंद्र चंद्रपूर या उपक्रमाला प्रा. डॉ. रोशन फुलकर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर यांनी सदिच्छा भेट देऊन आज बौद्ध हितकारिणी सभा आणि रमाई केअर रुग्ण सेवा चंद्रपूर यांना आपल्या वडिलांच्या 5 व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ मान. प्रा. डॉ. रोशन फुलकर सर यांनी आपल्या कडील Desktop Computer कार्यालयीन कामाकरीता भेट दिला. याबद्दल प्रा. डॉ. रोशन फुलकर व त्यांच्या कुटुंबियांचे बौद्ध हितकारिणी सभा चंद्रपूर आणि रमाई केअर रुग्ण सेवा केंद्र चंद्रपूर तर्फे अध्यक्ष डॉ. जितेंद्र खोब्रागडे, मान. मंगेश खोब्रागडे सचिव आणि ॲड प्रवीण जानगे विधी सल्लागार यांचे तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. रोशन फुलकर सर यांनी बौद्ध हितकारिणी सभा चंद्रपूर महाराष्ट्र यांच्या आज एक वर्षपूर्ती झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या, आणि भविष्यकालीन उपक्रमा करिता सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या