Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात 15 मे रोजी महात्मा फुले महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन (A Pandit Deendayal Upadhyay Job Fair will be organized at Mahatma Phule College in Ballarpur on May 15.)

बल्लारपूरात 15 मे रोजी महात्मा फुले महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन (A Pandit Deendayal Upadhyay Job Fair will be organized at Mahatma Phule College in Ballarpur on May 15.)

बल्लारपूर -: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे पार पडणार आहे. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांकडून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार असून युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
        युवकांना रोजगारासोबतच कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शनाचा लाभ या उपक्रमातून मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे व बायोडाटा घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच ०७१७२-२५२२९५ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती उपलब्ध आहे. याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. पंकज कावरे (९८५०४३९४०८) व लेफ्ट. प्रा. योगेश टेकाडे (९०४९८६८००१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या