चांदा ज्योती सुपर-100 मध्येचमकले नवभारत विद्यालयाचे 4 विद्यार्थी. तालुक्यातील एकमेव शाळेचे सुयश. (4 Students from Navabharat Vidyalaya Shine in 'Chanda Jyoti Super-100'. A Success Story for the Taluka's Sole School.)

Vidyanshnewslive
By -
0
चांदा ज्योती सुपर-100 मध्ये चमकले नवभारत विद्यालयाचे 4 विद्यार्थी. तालुक्यातील एकमेव शाळेचे सुयश. (4 Students from Navabharat Vidyalaya Shine in 'Chanda Jyoti Super-100'. A Success Story for the Taluka's Sole School.)

चंद्रपूर/मूल :- चंद्रपूर जिल्ह्या परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या चांदा ज्योती सुपर-100 या विशेष शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत नवभारत विद्यालयाचे 4 विदयार्थी यशस्वी होऊन या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षाचे विशेष शिक्षण व प्रशिक्षण जि. प. तर्फे देण्यात येणार आहे. जि. प. शिक्षण विभागाने घेतलेल्या चाळणी परिक्षेत प्रियांश मुकेश गोवर्धन, ओम काजू खोब्रागडे, क़िष्णा रामचंद्र गेडाम, वेद त्रिशूल गोंगले या विद्यार्थ्यांची निवड होणारी मूल तालुक्यातील नवभारत विद्यालय एकमेव आहे हे विशेष. निवड झालेल्या या चारही विद्यार्थी यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे पुढील उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची दारे सुरू करण्यात येणार आहेत. पात्र ठरलेल्या विदयार्थी निवासासाठी संपूर्ण खर्च शिक्षण विभाग करणार आहे. 
       चांदा ज्योती सुपर-100 हा शैक्षणिक उपक्रम 10 वी तील हुशार अनुसूचित जाती, जमाती तील विदयार्थी यांचेकरीता राबविण्यात आलेला आहे. पात्र उमेदवार निवडीकरीता चाळणी परिक्षा राबविण्यात आली व यात नवभारत विद्यालय मूल येथील 4 विदयार्थी पात्र ठरले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. चांदा ज्योती सुपर-100 उपक्रमांतर्गत पात्र ठरलेल्या या चारही मुलांचे शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, मुख्याध्यापक छत्रपती बारसागडे, पर्यवेक्षीका वर्षा भांडारकर यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)