Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत वन्यजिवाची शिकार करून अन्न प्राशन करणाऱ्या दोन व्यक्तीस अटक (Two individuals arrested for hunting wildlife for consumption within the Moharli Forest Range.)

मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत वन्यजिवाची शिकार करून अन्न प्राशन करणाऱ्या दोन व्यक्तीस अटक (Two individuals arrested for hunting wildlife for consumption within the Moharli Forest Range.)

चंद्रपूर :- दिनांक 28/03/2026 रोजी सकाळी अंदाजे 11.30 वाजताचे दरम्यान मोहर्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत सितारामपेठ बिटातील मौजा भामडेळी येथील मच्छीघाट इरई धरण येथे आरोपी नामे श्रीमती ज्योती शैलेश घंटसाल, वय- 35 वर्ष, रा. कैकलूरु, जिल्हा- क्रिष्णा (आंध्रप्रदेश) व त्यांचे पती नामे शैलेश सोमनाद्री घंटसाल वय- 38 वर्ष रा. कैकलूरु, जिल्हा- क्रिष्णा (आंध्रप्रदेश) यांनी Indian Flap Shell Turtle (Lissemys punctata) याला पकडून भाजी शिजवून खात असतांना आढळून आल्याने वनरक्षक श्री. सुरेंद्र मंगाम व क्षेत्र सहाय्यक मोहर्ली श्री. संजय जुमडे यांनी वनगुन्हा क्रमांक 09643/241056, दिनांक-28/03/2026 अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 51 अन्वये वनगुन्हा जारी केला. सदरचा तपास उपसंचालक (बफर) श्री. कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनात, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली श्री. संतोष थिपे, पुढील तपास करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या