Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक ! बुलढाण्यात चक्क ग्राहक 200 लिटरची पाण्याची टाकीत डिजल भरून गेलाय (Shocking! In Buldhana, a customer actually filled a 200-liter water tank with diesel at a petrol pump and drove off.)

धक्कादायक ! बुलढाण्यात चक्क ग्राहक 200 लिटरची पाण्याची टाकीत डिजल भरून गेलाय (Shocking! In Buldhana, a customer actually filled a 200-liter water tank with diesel at a petrol pump and drove off.)

बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याच बघायला मिळत आहे. तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेलही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला. तर इतरही ग्राहक पंपावर मिळेल ती भांडी, प्लास्टिकचे डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. 


       बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या इंधनाचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये मोठी धांदल उडाली आहे. डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषतः बुलढाणा - संभाजीनगर मार्गावरील धाड येथील पेट्रोल पंपावर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. येथे तब्बल 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या