Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा, राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीची मागणी (CM reviews district annual plan through VC, demands increased funds in state-level meeting)

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा, राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीची मागणी (CM reviews district annual plan through VC, demands increased funds in state-level meeting)

चंद्रपूर :- राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियेाजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे बुधवारी (दि.11) सन 2026-27 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा, जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांनी वाढीव निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीला वित्त व नियेाजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, आमदार सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार देवराव भोंगळे (राजुरा), आमदार किशोर जोरगेवार (चंद्रपूर), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याकरीता शासनाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 358 कोटी 89 लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी तर आदिवासी उपयोजनेकरीता 111 कोटी 48 लक्ष रुपये, कमाल वित्तीय मर्यादेत मंजूर केले आहे. मात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अंमलबजावणी यंत्रणामार्फत एकूण 1134 कोटी 15 लक्ष 24 हजार एवढी अतिरिक्त मागणी केली आहे. राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित आमदारांनीसुध्दा जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी वाढवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
           आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, जिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 358 कोटींवरून 600 कोटींपर्यंत वाढवून द्यावी, 3 वर्षात मामा तलावांचे नुतणीकरण करावे, 150 कोटींचे वूड म्युझियम तयार करून रिसर्च म्युझियम म्हणून त्याला मान्यता द्यावी, धानाचा बोनस त्वरीत द्यावा, जलजीवन मिशन मध्ये चंद्रपूरला 508 कोटी रुपये द्यावे, पोंभुर्णा आणि करंजी येथे आदिवासी एमआयडीसीची घोषणा करावी, वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या 137 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी त्वरीत निधी द्यावा, मुल पॉलिटेक्निक कॉलेज व गोंडवाना विद्यापीठाला निधी द्यावा, अशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते (व्हीआर) इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) करीता तसेच जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता निधी व जिवतीमध्ये सिंचनाचा प्रकल्प देण्याची विनंती केली. आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिरासाठी तसेच धानोरा बॅरेजसाठी बजेटमध्ये निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. जिल्हाधिका-यांकडून सादरीकरण यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 बाबत माहिती दिली. यात मागील सात वर्षातील मंजुर नियतव्यय, जिल्ह्यात विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधी, गाभा व बिगर गाभा क्षेत्रहनिहाय जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा 2026-27, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा शक्य चिकित्सक कार्यालय, मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जि.प. शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण, मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलिस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. बांधकाम विभाग, पशुसंवर्धन व दुग्धविकास, लघुपाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जि.प. ग्रामपंचायत विभाग, नगरपालिका प्रशासन, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाविन्यपूर्ण योजना आदींबाबत मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या