Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुक संबंधाने नागरीकांना पोलीस विभागाचे आवाहन (The police department appeals to citizens regarding the Chandrapur City Municipal Corporation elections.)

चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुक संबंधाने नागरीकांना पोलीस विभागाचे आवाहन (The police department appeals to citizens regarding the Chandrapur City Municipal Corporation elections.)


चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज १३ जानेवारी, २०२६ रोजी चंद्रपूर शहर महानगर पालिका निवडणुकीचे प्रचारार्थ विविध राजकीय पक्षातर्फे संपुर्ण शहरात ठिकठिकाणी मोटार सायकल रॅली व पायदळ रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रॅली कार्यक्रमामुळे शहरातील विविध रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी होवुन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाईक रॅलीचा मार्ग 1) बागला चौक - गांधी चौक, पठाणपुरा ते गांधी चौक, गांधी चौक - जटपुरा गेट, बिनबा गेट - श्री टॉकीज चौक, बंगाली कैम्प चौक सावरकर चौक
2) दुर्गापूर डब्ल्युसीएल ग्राऊन्ड ते बंगाली कॅम्प सीएचएल हॉस्पीटल ते रोड - मातोश्री स्कूल चौक - तुकूम मार्गे वरोरा नाकाद्वारापुल - मित्रनगर चौक ते संत फक्त राम चौक बिनबा - मिलन चौक-जोडदेऊळ (पठाणपुरा गेट पर्यंत) करीता नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शक्यतो अत्यावश्यक कामाशिवाय शहरातील वरील नमुद मार्गाचा वापर करण्यास टाळावे. तसेच बाईक रॅली मधील सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येते की, बाईक रॅली मध्ये सहभागी होतांना सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. तसेच सर्व कागदपत्र योग्य असलेले वाहनाचा वापर करावा. रॅली दरम्यान हॉस्पिटल मध्ये जाणाऱ्या नागरिकांना व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी. वेळोवेळी प्रशासनाद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या