राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितीच्या निवडणुकाचं बिगुल आज वाजणार, सायंकाळी 4:00 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (The election process for 12 Zilla Parishads and 125 Panchayat Samitis in the state will be announced today; the State Election Commission will hold a press conference at 4:00 PM.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे आज बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज सायंकाळी 4:00 वाजता सह्याद्री अतिथी गृहात पत्रकार परिषद घेऊन झेडपी निवडणूक जाहीर करणार असल्याची माहिती आहे. झेडपी निवडणुका २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या झेडपींची निवडणूक तर ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नसलेल्या १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आयोग आणि राज्य सरकारने हालचालींना वेग दिला आहे. दरम्यान, 'मिनी विधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये नवीन विकासकामांना मंजुरी, निधी वाटप, बदल्या, जाहिरातबाजी यावर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि प्रशासनाची लगबग वाढली असून ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)