चंद्रपूर महानगरपालिका आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ४१ देखरेख पथके कार्यरत (The Chandrapur Municipal Corporation has deployed 41 monitoring teams for the effective implementation of the code of conduct.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर महानगरपालिका आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ४१ देखरेख पथके कार्यरत (The Chandrapur Municipal Corporation has deployed 41 monitoring teams for the effective implementation of the code of conduct.)

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत ४१ विविध देखरेख पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, तसेच बेकायदेशीर प्रचार, रोख रक्कम, मद्य, भेटवस्तू वितरण यांस प्रतिबंध घालण्यासाठी सकाळी ८ व संध्याकाळी ८ अशा एकूण १६ स्थायी निगराणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० फिरती पथके (Flying Squad) कार्यरत असून, प्रचार सभा, मिरवणुका व इतर निवडणूक कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० व्हिडिओ देखरेख पथके कार्यरत आहेत. या व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या चित्रफितींचे परीक्षण करून आचारसंहिता उल्लंघनाची प्रकरणे निष्पन्न करण्यासाठी ५ व्हिडिओ परीक्षण पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे निवडणूक आचारसंहिता उल्लंघन निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित पथक किंवा निवडणूक प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)