भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त बल्लारपूरात दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन (A two-day awareness program has been organized in Ballarpur on the occasion of Bhima Koregaon Valor Day.)

Vidyanshnewslive
By -
0
भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त बल्लारपूरात दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन (A two-day awareness program has been organized in Ballarpur on the occasion of Bhima Koregaon Valor Day.)

बल्लारपूर :- भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्यस्तंभ विजयाला स्मरण करून देणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बल्लारपूर शहरात बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ व गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत विजय स्तंभ परिसर, जय भीम चौक, बल्लारपूर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सामूहिक बुद्ध वंदना होणार असून, सायंकाळी ७.३० वाजता भगवान गावंडे अकोला यांचा पोवाडा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या पोवाड्यातून इतिहासातील शिव, भीम आणि कोरेगाव क्रांतीचा जागर करण्यात येणार आहे. रात्री १२ वाजता अस्मितेसाठी रक्ताचे सिंचन करणाऱ्या शूरवीर योद्ध्यांना अभिवादन करून विजय स्तंभास मानवंदना देण्यात येणार आहे. 


         गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बल्लारशाह नगर परिषद जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजारोहण, उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रतिनिधीत नागरिकांच्या हस्ते विजय शौर्य स्तंभाला सलामी, मानवंदना व अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समीर लेनगुरे इतिहास अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली शौर्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता विदर्भस्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धा होणार असून, भारतातील जातींची खरी सामाजिक स्थिती आणि राजकीय हस्तक्षेप” व “भारतीय प्रसार माध्यमांची जबाबदारी” हे विषय ठेवण्यात आले आहेत. सायंकाळी ४ वाजता देशभक्तीपर महापुरुषांवर आधारित कार्यक्रम व संगीत सादर होणार असून, रात्री ९ वाजता इंजी. पवनपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन जेबीबीएस विदर्भ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)