Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरातील जुन्या पॉवर हाऊस परिसरात कोंबड झुंजिवर बल्लारपूर पोलिसांची धाड, 3 अटकेत (Ballarpur police raided a cockfighting event in the old power house area of ​​Ballarpur, and three people were arrested.)

बल्लारपूरातील जुन्या पॉवर हाऊस परिसरात कोंबड झुंजिवर बल्लारपूर पोलिसांची धाड, 3 अटकेत (Ballarpur police raided a cockfighting event in the old power house area of ​​Ballarpur, and three people were arrested.)


बल्लारपूर :- बल्लारपूर येथील जुन्या पावर हाऊसच्या मागील झुडपी जंगल परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव मनोज वैरागडे (वय २२), रा. विसापूर, गणेश तुळशिराम मेंदाळे (वय ३२), रा. गांधी वार्ड बल्लारपूर आणि गणेश चरणदास गराड (वय ४२), रा. विसापूर अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई २८ डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. मौक्यावरील तपासात दोन कोंबडे मृतावस्थेत तर तीन कोंबडे जिवंत आढळले. आरोपींच्या अंगझडतीत जुगारातून मिळालेली रोकड, तीन दुचाकी वाहने, कोंबड्यांच्या पायात बांधलेल्या कात्या (धारदार हत्यारे) तसेच इतर साहित्य असे एकूण सुमारे ८२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस ठाणे बल्लारपूर येथील गुन्हे शोध पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपी कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच काही इसम पसार झाले, तर तिघे आरोपी घटनास्थळी मिळून आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास जुमनाके, प्रवीण नीकोडे, पोअं सचिन अल्लेवार, लखन चव्हाण, गुरू शिंदे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या