राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीसह १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त (The State Excise Department conducted a major operation, seizing goods worth ₹1.04 lakh, including illegally sold liquor, in the backdrop of the municipal corporation elections.)

Vidyanshnewslive
By -
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीसह १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त (The State Excise Department conducted a major operation, seizing goods worth ₹1.04 lakh, including illegally sold liquor, in the backdrop of the municipal corporation elections.)

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉश आउट मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी २६ डिसेंबर २०२५ रोजी जलनगर व महाकाली कॉलरी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत मोहा सडवा, मोहा दारू तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारू असा एकूण १ लाख ४ हजार ९०६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग दरम्यान खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर जलनगर व महाकाली कॉलरीतील काही घरांवर धाडी टाकण्यात आल्या. कारवाईदरम्यान तीन इसमांनी पथकाची चाहूल लागताच दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल बेवारस सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी ३ महिलांसह इतर ३ अज्ञात इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त मुद्देमालात मोहा रसायन १३५० लिटर, मोहा दारू १५६ लिटर तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारू ३०.६९ लिटर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. सदर कारवाई निरीक्षक संजय मिठारी, अभिनंदन कांबळे, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, दत्तात्रय वरठी, सोमेश्वर गव्हारे, प्रमोद राजोते, सागर धिडशे, अतुल भिवगडे, सहायक दुय्यम निरीक्षक राहुल अत्रे तसेच जवान किशोर पेदुजवार, जगन पुट्टलवार, संजय हरिणखेडे, सुजित चिकाटे, प्रशांत घोडमारे आणि महिला जवान सुकेशनी कारेकार, वैशाली सातपुते यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)