Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

MPSC चा पुन्हा सावळागोंधळ, एकाच दिवशी UGC- NET व MPSC ची परीक्षा विद्यार्थी संभ्रमात...! (MPSC in chaos again, students confused as UGC-NET and MPSC exams on the same day...!)

MPSC चा पुन्हा सावळागोंधळ, एकाच दिवशी UGC- NET व MPSC ची परीक्षा विद्यार्थी संभ्रमात...! (MPSC in chaos again, students confused as UGC-NET and MPSC exams on the same day...!)

वृत्तसेवा :- एमपीएससीने पूर्व परीक्षा २१ डिसेंबर रोजी जाहीर केली होते. मात्र त्याचदिवशी नगरपरिषद व पंचायती समितीच्‍या निवडणुकीची मतमोजणीची तारीख निश्चित झाली. त्‍यामुळे सदर परीक्षा एमपीएससीने ४ जानेवारी रोजी घेणार असल्‍याचा निर्णय सोमवारी घेतला. मात्र, त्‍याच दरम्‍यान विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठीची यूजीसी नेट परीक्षा होणार आहे. यासंदर्भात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे म्‍हणाला, एक तर परीक्षा वेळेवर होत नाहीत. वेळापत्रक जाहीर झाले तर दोन दोन परीक्षा एकत्र येत आहेत. त्यामुळे अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागू शकतील. त्‍यामुळे आता आयोगामार्फत त्‍याच दिवशी परीक्षा घेणार की त्यात बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्‍यामुळे दोन परीक्षा एकाच दिवशी आल्‍याने पुन्‍हा उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब ‘ (अराजपत्रित) ही परीक्षा ४ जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्‍याच दरम्‍यान म्‍हणजे ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्‍यान यूजीसी-नेट परीक्षा होत आहे. त्‍यामुळे आता कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या