स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरात लोखंडी देशी कट्ट्यासह एका व्यक्तीस अटक (Local Crime Branch action, one person arrested with an iron country-made knife in Ballarpur)
बल्लारपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत सापळा रचून दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी सलमान उर्फ राज सलीम खान (वय ३२, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) या इसमाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून अवैधरित्या बाळगलेला देशी बनावटीचा लोखंडी देशी कट्टा (किंमत अंदाजे ₹८,०००/-) जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक १०१५/२०२५ नोंदवून आरोपीवर कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना धडा मिळाला असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश देणारी ही कारवाई ठरली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, पोअं. नितीन रायपुरे, शेखर माथनकर, शशांक बादामवार, चापोहवा प्रमोद डंभारे, दिनेश अराडे यांनी मोलाची भूमिका बजावली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या