चंद्रपूरसह नागपूर, अकोला व अमरावती महायुती एकत्र, मात्र चंद्रपूर व अकोल्यात राष्ट्रवादी बाहेर असणार ? (The Mahayuti alliance is together in Nagpur, Akola, and Amravati, including Chandrapur, but will the NCP be out of the alliance in Chandrapur and Akola ?)
चंद्रपूर - विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चारही शहरात भाजप आणि शिवसेना महायुती करत निवडणूक लढवणार आहे. तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ही समावेश राहणार आहे. मात्र नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल, अशी खात्रीलायक माहिती आहे. नागपुरात काल (गुरुवारी) भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये तत्वतः विदर्भातील चारही शहरात भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचे ठरले आहे. दरम्यान, कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही. साधारणपणे दोन्ही पक्ष चारही शहरात आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल आणि त्याच्यातूनच कोणता पक्ष किती जागा लढवत आहे, हे स्पष्ट होईल. अशी माहिती शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली. नागपुरात काल (गुरुवारी) भाजपच्या विदर्भ कार्यालयात दुपारपासूनच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत अकोला, अमरावती आणि चंद्रपूर मधील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. दुसऱ्या बाजूला उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पार पडली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यालयात येऊन भाजप नेत्यांची भेट घेतली आणि त्यामध्येच दोन्ही पक्ष चारही शहरात महायुती करून निवडणूक लढवतील असे ठरले आहे. राज्यात महायुती सरकारमध्ये भाजपचा मित्र पक्ष शिवसेना (शिंदे) सोबत चंद्रपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने युती केली आहे. महापालिका स्तरावरील या युतीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक समन्वय समिती गठीत केली आहे. मात्र याच युतीमधील दुसरा घटक पक्ष असलेला अजित पवार गटाबाबत मात्र भाजपाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने आज चंद्रपुरात अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर महानपालिकेत भारतीय जनता पक्षात तीन नेत्यांमध्ये असलेल्या विसंवादी भूमिकेत आता शिंदेसेना कुणाला फायद्याची ठरेल आणि कुणाला मारक याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपा - शिवसेना शिंदे गट यांच्यात युती झाल्यानंतर चंद्रपूर मनपातील ६६ जागांपैकी शिंदेसेनेच्या वाट्याला किती जागा जाणार आहेत याचा अद्याप निर्णय झाला नसला तरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी युतीतील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक समन्वय समिती गठीत केली आहे. यात भाजपाकडून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार, आ.किशोर जोरगेवार, सुभाष कासनगोट्टूवार, राहुल पावडे तर शिंदेसेनेकडून दिपक सावंत, आशिष जयस्वाल, किरण पांडव आणि युवराज धानोरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर मनपासाठी महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेसोबत भाजपाने युती केली असली तरी दुसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मात्र युतीबाहेर असल्याने चंद्रपुरात या युतीचा काय परिणाम होईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदेंसेनेचा लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे याला मात्र या युतीबाबत विश्वासात घेतले गेले नाही . विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती नगर परिषदेत मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकीत शिंदे सेनेचा विजय झाला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यात मुकेश जीवतोडे यांची भूमिका महत्त्वाची असताना चंद्रपूर मनपातील युतीबाबत मुकेश जीवतोडे यांना डावलण्यात आले आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या