दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस) दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने नामनिर्देशनपत्रे स्विकारणार - राज्य निवडणूक आयोगाचे आदेश (Nomination papers will be accepted through both methods i.e. online and offline during the period from 15/11/2025 to 17/11/2025 (all three days) - State Election Commission orders)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५-नामनिर्देशन पत्र दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा स्विकारण्याबाबत राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतू या संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग खालील प्रमाणे निर्देश देत आहेत;  "दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.१६/११/२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील". याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना निर्गमित कराव्यात. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार (सुरेश काकाणी) सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)