Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'भारतीय संविधान – समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेबांचा दृष्टिकोण ' या विषयावर महाचर्चा (On the occasion of the Amrit Jubilee Year of the Constitution, a grand discussion on the topic 'Indian Constitution – Foundation of Equality and Dr. Babasaheb's Perspective')

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'भारतीय संविधान – समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेबांचा दृष्टिकोण ' या विषयावर महाचर्चा (On the occasion of the Amrit Jubilee Year of the Constitution, a grand discussion on the topic 'Indian Constitution – Foundation of Equality and Dr. Babasaheb's Perspective')

चंद्रपूर :- भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि लॉर्ड बुद्धा टिव्हीच्या १५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड बुद्धा टिव्ही व राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे राज्यव्यापी सन्मान बाबासाहेबांचा – जागर संविधानाचा ही भव्य वैचारिक मोहिम राबविण्यात येत आहे. १५ ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील १० प्रमुख जिल्ह्यांत ही मोहिम आयोजित असून, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार, तुकूम येथे सायं. ६ ते ९ या वेळेत भारतीय संविधान – समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेबांचा दृष्टिकोण या विषयावर महाचर्चा होणार आहे. या चर्चासत्रात प्रख्यात बहुजन विचारवंत प्रा. दिलीप चौधरी, ओबीसी अभ्यासक ऍड. वैशाली टोंगे, ऍड. राजस प्रवीण खोब्रागडे, ऍड सत्यपाल कातकर, संविधान तज्ञ ऍड. पुनम वाघमारे/उमरे यांचा सहभाग राहणार असून, भारतीय संविधान, समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीवर सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे. 
         लॉर्ड बुद्धा टिव्हीचे प्रसारण सध्या २२ राज्यांमध्ये २४x७ विविध केबल नेटवर्कद्वारे सुरू आहे. तसेच ओटीटी, मोबाइल अॅप, स्मार्ट टीव्ही आणि यूट्यूबवरही हा चैनल जगभरात उपलब्ध आहे. २६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून सुरू झालेल्या या चैनलने डॉ. आंबेडकर विचार, बौद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तन जनतेपर्यंत सातत्याने पोहोचविले आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाची जागरूकता प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे, असे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे मुख्य संचालक सचिन मून यांनी सांगितले. या वैचारिक मोहिमेचा शुभारंभ १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथून झाला असून, पुढील कार्यक्रम अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांत पार पडतील. मोहिमेचा समारोप संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे छाया–आकांक्षा भीमगीतांचे भव्य लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करून करण्यात येणार आहे. चंद्रपूरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाचर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन लॉर्ड बुद्धा टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी मनोज मोडक आणि सिद्धार्थ बुद्ध विहार समितीचे सचिव मारोतराव रायपुरे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी बाळकृष्ण जिवणे, सतिश रामटेके, सुनिल साव, जनार्दन वाघमारे, कपिला मेश्राम, जयंती वनकर, वंदना जीवने, छाया गडलिंग, रीना नळे सह आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या