राजकारण :- प्रा. महेश पानसे.
मूल :- महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तर्फे जनमान्य माजी सभापती प़शांत समर्थ यांच्या 'श्रीमती' एकता समर्थ तर भाजप तर्फे इंजीनियर तथा व्यावसायिक किशोर कापगते यांच्या 'श्रीमती' जनताभिमुख डॉ. प्रा. किरण कापगते यांना मैदानात उतरविण्यात उतरविले. दोहोंपैकी एक ' श्रीमती 'मैदान मारेल व नगराध्यक्ष बनेल. कोण बनेल हे मतदानानंतर ईव्हीएम ठरवेल. अपवाद साेडला तर 'पैसेवाल्याचेच राजकारण' ही म्हण जरी खरी असली तरी मूल नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारांची निवड करताना कांग्रेस व भाजपा. या दोन्ही पक्षांनी 'श्रीमती'च्या निव्वळ श्रीमंतीचा विचार न केल्याचे लक्षात येते. कांग्रेस वाल्यांनी सौ. एकता समर्थ तर भाजपा. वाल्यांनी डॉ. सौ. किरण कापगते यांची निवड करताना त्यांचे पारिवारिक जनकार्य काम करण्याची लकब सुद्धा लक्षात घेतली दिसते. एक मालदार रेती व्यावसायीक आपल्या 'श्रीमती' च्या उमेदवारीसाठी शेवट पावेतो लक्ष्मीची झलक दाखवीत बसले पण मैदानात उठले नाहीत. कांग्रेस मध्येही रग्गड आसामी मैदानातून बाद झाले. कांग्रेस ने योग्य उमेदवार देण्याकरिता प्रसंगी शहरातील जनाधार लाभलेल्या व जुने भाजप. द्वेष्टे असलेल्या समर्थ यांना वाव देऊन एकता समर्थ यांना उमेदवारी दिली. एकंदरीत प्रशांत समर्थ यांची लोकप्रियता "कॅच" करण्यात कांग्रेसला यश मिळाले. भाजपा कडे उमेदवारी करीता फेटे बांधून 'श्रीमती' करीता अनेक रग्गड येरझारा मारताना दिसले. शांत, संयमी, उच्च शिक्षाविभुषीत व जनमानसात रुळलेल्या किरण कापगते यांना उमेदवारी देऊन 'श्रीमंती' ची व्याख्या बदलविली.
एकता समर्थ व किरण कापगते यांच्या ' श्रीमंती' चे मोजमाप त्यांच्या परिवारजनांचे आजवरील जनकार्य, लाभलेला जनाधार, दोघींची राजकीय परिपक्वता, शहरसेवेची आस यातून करण्यात आले हे मात्र निश्चित. विजयश्री एकीला मिळेल मात्र दोन्ही उमेदवार तोडीचे ही धारणा मूल शहरात पसरली आहे. हे चांगले राजकीय संकेत समजले जातात. कांग्रेस च्या एकता समर्थ यांचे मागे माजी सभापती, जनाधार लाभलेले कार्यकर्ते प्रशांत समर्थ यांची आजवरील सेवेची 'श्रीमंती' आहे. हसमुख व्यक्तीमत्व असलेल्या प्रशांत समर्थ यांची राजकीय कारकीर्द कुठेही डागाळलेली दिसत नाही. कांग्रेस ची हवा नसली,नसली तरी प़शांत समर्थ यांची स्थानिक पकड कायम आहे. भाजप ची असलेली हवा डॉ. किरण कापगते यांची उमेद जागविणारी आहे. स्वता किरण कापगते हया सुस्वभावी, दुरदुष्टी असलेली उच्च शिक्षाविभुषीत उमेदवार समजल्या जातात. लाडक्या बहिणींमध्ये त्यांचा सुसंवाद असलेल्या उमेदवार असल्याचे बोलले जाते. एकता समर्थ ह्यांच्या पाठीशी प़शांत समथॅ हयांच्या लोकाभिमुखतेची 'श्रीमंती' तर किरण कापगते ह्यांना व्यक्तीमत्वासह पक्षीय बलाची 'श्रीमंती'असल्याचे बोलले जाते. नगराध्यक्ष पदाचे गत निवडणुकांमध्ये लक्ष्मीचे दर्शन भलमार झाले हे वेगळे सांगायची गरज नाही आता मात्र दोन्ही उमेदवार स्व कामाने, पारिवारिक कार्याने 'श्रीमंत" असल्याने मतदारांनी आपल्या सदविवेक बुद्धीने मतदान करावे व आदर्श घडवावे असे जाणकारांना वाटते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या