बल्लारपूरात काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकसाठी शेकडो पदाधिकारी उत्सुक; नगराध्यक्षपदासाठी ३ अर्ज तर नगरसेवक पदासाठी 9 नोव्हेंबर रोजी मुलाखती (Hundreds of office bearers eager for Congress party corporator post in Ballarpur; 3 applications for mayor post, interviews on November 9 for corporator post)
बल्लारपूर :- नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच, शहर काँग्रेस कमेटीने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी अर्ज मागवले होते. यासाठी काँग्रेस पक्षाच्या शेकडो (दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक आणि कामगार) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अर्ज केले. तसेच ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठीही ३ जणांनी अर्ज केले आहे. ज्यामध्ये बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांची सून चैताली दीपक मूलचंदानी, बल्लारपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलदीवार यांच्या पत्नी मीनाक्षी कुलदीवार आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई यांच्या पत्नी अलका वाढई यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केले. सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस पक्षातर्फे 9 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर शहरातील एकदंत लान मध्ये नगरसेवक पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकी संदर्भात, बल्लारपूर नगरपरिषद सदस्यपदासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती रविवार दि.०९/११/२०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड येथील एकदंत लॉन येथे पार पडली मुलाखत कार्यक्रमात बल्लारपूर विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री आणि प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत, जैनुद्दीन जव्हेरी, घनश्याम मूलचंदानी, डॉ. रजनीताई हजारे, शहराध्यक्ष देवेंद्र आर्य प्रामुख्याने उपस्थित होते. मुलाखतीच्या बैठकीत बल्लारपूर शहराच्या एकूण १७ प्रभागाच्या ३४ जागांसाठी ६७ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. इच्छुक उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक पण शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांसोबत आघाडीच्या चर्चेच्या अंतिम फेरी सुरू आहेत. तसेच स्थानिक आघाडीसोबत आघाडीची चर्चा सुरू आहे. नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष नगराध्यक्षपद जिंकेल तसेच काँग्रेस पक्षाला नगर परिषद सदस्यांच्या संख्येत बहुमत मिळेल. - देवेंद्र आर्या, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर.
या निवडणुकीत घटक (दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक, कामगार) काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा आहे. सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्याचा संकल्प केला आहे. कौल काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागेल.- अब्दुल करीम शेख, मुख्य अध्यक्ष, शहर कमेटी
आजही शहरातील मतदारांमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल तीव्र ओढ आहे. नगरपरिषदेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात काँग्रेस पक्षाने सर्वात जास्त काळ राज्य कारभार केले आहे. यावेळी सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील. आणि मला केवळ विश्वास नाही तर पूर्ण विश्वास आहे की यावेळी जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे नगर नगरसेवक निवडून येतील आणि काँग्रेस पक्षाची उमेदवार अध्यक्ष पदासाठी विजयी होईल. - घनश्याम मूलचंदानी, सचिव, प्रदेश कमेटी महाराष्ट्र
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या