4 नोव्हेंबर रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्याग्रस्त महिलांनी जनसुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन (On November 4, the 'Women's Commission at Your Door' initiative appeals to women facing problems to attend the public hearing.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या 3 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. जिल्ह्यातील महिलांच्या समस्येबाबत जनसुनावणी घेण्याकरीता 4 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या महिलांना समस्येबाबत निवेदन द्यायचे आहे, त्यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे जनसुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)