Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

प्रा. प्रफुल्ल शेंडे मराठी विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण. (Prof. Prafulla Shende passed the SET exam in Marathi subject.)

प्रा. प्रफुल्ल शेंडे मराठी विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण. (Prof. Prafulla Shende passed the SET exam in Marathi subject.)

राजुरा :-- गुरूदेव नगर वार्ड, धोपटाळा तहसील राजुरा येथील रहिवासी प्रा. प्रफुल्ल राजेश्वर शेंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ द्वारा दिनांक १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेत मराठी विषयामध्ये उत्तम कामगिरी करत प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे. या परीक्षेत ९० हजार च्या वर विद्यार्थी बसले होते. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत केवळ ६.६९ टक्के विद्यार्थीच पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षांत राज्यशास्त्र विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण झालेले प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आता पुन्हा तब्बल १० वर्षानंतर दुसर्‍याच प्रयत्नात मराठी विषयातून उल्लेखनीय यश संपादन करीत प्राध्यापक पदाकरिता पात्रता मिळवली आहे. दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचे नाव पात्र उमेदवारांमध्ये घोषित करण्यात आले आहे. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आपले शालेय शिक्षण मुल तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, गडीसुर्ला या आपल्या जन्म गावी पुर्ण केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज राजुरा व बी. ए. श्री. शिवाजी महाविद्यालय राजुरा येथून पुर्ण केले, पुढे २००५ मध्ये त्यांनी एस. पी. काॅलेज चंद्रपूर येथे मराठी विषयात एम. ए. आणि जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे yबी. एड. चे शिक्षण पुर्ण केले. सन २००६ पासून ते आजतागायत विविध आस्थापनांमध्ये प्राध्यापक, कार्यकारी प्राचार्य म्हणून काम करीत आले आहेत. ते ४ विषयात उत्कृष्ट गुणांसह एम. ए. उत्तीर्ण आहेत. मागील १५ वर्षांपासून पत्रकारिता तसेच साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा स्व. सखुबाई बेले, स्व. जैराम बेले, स्व. कृष्णाजी शेंडे, स्व. गंगुबाई शेंडे, आई स्वर्गीय निर्मला राजेश्वर शेंडे - वडिल श्री. राजेशराव कृष्णाजी शेंडे, भाऊ, बहीणी, काका, काकू, मामा, मामी, मावशी यांचे आशीर्वाद, पत्नी सौ. सुषमा प्रफुल्ल शेंडे, मुलगा प्रसून प्रफुल्ल शेंडे याचे सहकार्य आणि विविध महाविद्यालयांतील सहकारी प्राध्यापकवृंदांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून, मित्र परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या