स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ३.३८ लाखांचा मुद्देमालासह दोन आरोपीना अटक (Local Crime Branch action, two accused arrested with valuables worth Rs 3.38 lakh)
चंद्रपूर :- जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांकडून चोरी, घरफोडी व अवैध धंद्याविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली. रामप्रवेश धिरज ठाकुर (५४), रा. महाकाली नगरी-२, देवाडा, पडोली यांच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरातील पेंट व इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याची फिर्याद पडोली पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी दाखल होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करीत असताना मौजा दुर्गापुर येथील दोन संशयितांची माहिती मिळाली.
त्यावर कारवाई करत पथकाने शादाब शब्बीर सैफी (२९) व सोहेल कादीर सय्यद (२८), दोघेही रा. नेरी वार्ड, दुर्गापुर या रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेले ऑटो रिक्षा, दुचाकी तसेच पेंट व इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींना पुढील तपासासाठी पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर कारवाई सपोनि. दिपक कांक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, चापोअं. मिलींद टेकाम यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या