स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बीएसएनएलचे कॉपर केबल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात (Local Crime Branch action, gang stealing BSNL copper cables caught by police)
चंद्रपूर :- बीएसएनएल कंपनीचे तब्बल २४ लाख रुपये किमतीचे कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने अवघ्या २४ तासांत गजाआड केले. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीचा केबल, ट्रक व इतर साहित्य असा एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ८ सप्टेंबर रोजी बीएसएनएलचे कनिष्ठ अभियंता अभिजीत अशोक जिवणे रा. नगीनाबाग, चंद्रपूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. अज्ञात आरोपींनी कॉपर केबल चोरी करून सुमारे २४ लाखांचा माल लांबविल्याची नोंद झाली होती. यावरून गुन्हा क्र. ७४१/२०२५ कलम ३०३ (२), भारतीय न्याय संहिता-२०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासासह गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. तपासात आरोपींनी कंत्राटी कामगार असल्याचे भासवून हेल्मेट, रिफ्लेक्टर जॅकेट व प्लास्टिक बॅरिकेड्सच्या साहाय्याने दुरुस्तीच्या नावाखाली कॉपर केबल कापून नेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कोसारा रोडवर संशयास्पद उभा असलेला एक आयशर ट्रक (क्र. युपी-२४ बीटी-७०४६) तपासला असता त्यामध्ये चोरीस गेलेला कॉपर केबल, हेल्मेट, जॅकेट, बॅरिकेड्स आढळले. यावेळी आरोपी नरेंद्र सोरनसिंह मौर्या (२२), रा. उधैनी, उत्तरप्रदेश व नाजीम शोख असमुद्दीन शेख (२६), रा. कलपीया, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा गणेश भोयर, जयंत चुनारकर, नितेश महात्मे, सचिन गुरनुले, किशोर वैरागडे, जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, अजय बागेसर, नितीन कुरेकार, सुरेद्र महंतो, संजय वाढई, दिपक डोंगरे, पोअं मिलींद जांभुळे, प्रदिप मडावी, शशांक बादामवार, किशोर वाकाटे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अजित शेन्डे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, चापोवा दिनेश अराडे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या