Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

तालुका स्तरीय वॉलीबॉल स्पर्धेचे महात्मा फुले महाविद्यालयात आयोजन, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा 19 वर्षाखालील मुलांचा संघ जिल्हास्तरावर (Taluka level volleyball tournament organized at Mahatma Phule College, Mahatma Jyotiba Phule College's under-19 boys' team at the district level)

तालुका स्तरीय वॉलीबॉल स्पर्धेचे महात्मा फुले महाविद्यालयात आयोजन, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा 19 वर्षाखालील मुलांचा संघ जिल्हास्तरावर (Taluka level volleyball tournament organized at Mahatma Phule College, Mahatma Jyotiba Phule College's under-19 boys' team at the district level)

बल्लारपूर :- एम.जे.एफ. कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चे खेळाडू वॉलीबॉल मध्ये जिल्हास्तरावर पोहोचले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे पटांगणावर तालुकास्तरीय हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन दिनांक 8 सप्टेंबर 2025 ला करण्यात आले. यामध्ये 14 वर्षे खालील, 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या विविध शाळातील संघांनी सहभाग घेतला. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा 19 वर्षाखालील मुलांचा संघ विजय ठरला. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील मोंटफोर्ट कॉन्व्हेंटचा मुलांचा संघ विजयी ठरला व मुलींचा माऊंट कॉन्व्हेंट चा संघ विजय ठरला ,14 वर्षाखालील मोंटफोर्ट कॉन्व्हेंट चा मुलांचा व मुलींचा के. जी. एन. कॉन्व्हेंट चा संघ विजय ठरला. तालुका संयोजक किशोर मोहूर्ले प्रामुख्याने उपस्थित होते. बल्लारपूर स्पोर्ट्स व बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद आवते, वरिष्ठ खेळाडू समीउल्ला खान, प्रा. महेंद्र भोंगाडे,  प्रा.युवराज बोबडे, शांताराम वाडगुरे, चंद्रकांत मैदमवार यांनी या सामन्याचे उत्कृष्टरित्या नियोजन पार पाडले. रेफरशिप मध्ये प्रा.युवराज बोबडे, मंथन कुकडकर, बेंजामिन ,सुरेश गोडे यांनी पार पाडले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय च्या संघात रॉयल मॅथ्यू, नेसलीन जोस, फेबियो के एस, नैतिक कुकडकर, अल्बिन एम एस, अल्बिन बाबू यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ जिल्हास्तरावर पोहोचल्याने संस्थाध्यक्ष संजय कायरकर , प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हास्तरीय सामन्याकरता खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या