Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागाची समन्वय बैठक (Police Department coordination meeting to maintain law and order in the backdrop of Ganeshotsav and Eid-e-Milad festivals)

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागाची समन्वय बैठक (Police Department coordination meeting to maintain law and order in the backdrop of Ganeshotsav and Eid-e-Milad festivals)

बल्लारपूर :- येत्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राजुरा पोलीस उपविभागची समन्वय बैठक बल्लारपूर येथील एकदंत लॉन येथे पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले की, उत्सव काळात वैद्यकीय पथक उपलब्ध राहणार आहे. डीजे बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असून उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. गणेशोत्सवासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मंडळाचा व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येईल. त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, सचिव तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असेल. या वेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश दौंड, बल्लारपूरचे नायब तहसीलदार सतिश साळवे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमाजी धुमाळ, बल्लारपूरचे ठाणेदार बिपिन इंगळे व राजुराचे ठाणेदार सुमित परतेकी उपस्थित होते.
          उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण परवानगी घेऊन, शांततेत आणि भाईचाऱ्याने साजरे करण्याचे आवाहन केले. कातकडे यांनी पुढे सांगितले की, आदर्श गणपती मंडळ पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर, समाजप्रबोधनात्मक देखावे, विसर्जन मिरवणुकीत महिलांचा व ज्येष्ठांचा सहभाग, वृक्षारोपण, चित्रकला व संगीत स्पर्धा, रक्तदान, व्यसनमुक्ती तसेच प्लास्टिक मुक्त उपक्रम या बाबींना प्राधान्य दिले जाईल. सोशल मीडियाचा योग्य वापर करून उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी शहरातील गोल पुलीया संदर्भात रेल्वे प्रशासनाशी तातडीने बैठक घेऊन जीएसबी टाकण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गणपती घाटावर लायटिंगची व्यवस्था आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तातडीने हाती घेतली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत पत्रकार वसंत खेडेकर, मनोहर दोतपल्ली, रमेश निषाद, समीर केणे, राहुल गायकवाड, ग्यानेंद्र आर्य, यांच्या सह बल्लारपूर शहरातील पत्रकार बांधव, सादीक जव्हेरी, अफजल अली, नरेश मुंदडा तसेच चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे काशिनाथ सिंह, नासीर उर्फ भुरू, अमर रहिकवाऱ आदींनी सुचना मांडल्या. याशिवाय गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, डीजे मालक, कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश खरसान, एम.एस.ई.डी.सी.एल. चे उपकार्यकारी अभियंता अरविंद कातकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख तसेच राजुरा पोलीस उपविभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या